Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून…

Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून…

| Updated on: Apr 15, 2026 | 3:50 PM

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. अलीकडेच त्याचा नॅशनलाईज बँकेसंबंधी नवा कारनामा उघड झाला आहे. यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येतंय.

भोंदू खरातने अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली होती. यांपैकी काही एकर जमीन त्याने शिर्डी येथे देखील खरेदी केली होती. त्याची ही सगळी जमीन एकूण 11 ते 12 एकर असल्याचं समोर आलं होतं. अलीकडेच त्याने खरेदी केलेल्या 4 एकर जमीनीसाठी नॅशनलाईज बँक खात्याचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप आहे. या नॅशनलाईज बँकेतील खाती कल्पना खरातच्या नवावर आहेत. संबंधित खात्यायंमधून 17 कोटींचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.पोलीस यंत्रणा पुढील तपास करत असून बरीच माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Apr 15, 2026 03:50 PM
Follow Us