Ashok Kharat | भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, SIT आणि आयकर विभागानंतर आता सरकारी वकिलांची नियुक्ती
स्वतःला ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याचे गैरकृत्य आता उघड झाले आहेत. तो भक्तांना फसवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत होता आणि काही मोठ्या अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे.
स्वतःला ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याचे गैरकृत्य आता उघड झाले आहेत. तो भक्तांना फसवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत होता आणि काही मोठ्या अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे. एसआयटी (SIT) आणि आयकर विभाग या दोन्हींकडून एकाच वेळी चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजय मिसर यांना मोठ्या आणि गुंतागुंतीच्या खटल्यांचा चांगला अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, दादर ऑपेरा हाऊस बॉम्बस्फोट आणि रवी पुजारी प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम केले आहे. एकूणच, या प्रकरणाचा तपास सखोलपणे सुरू असून, पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
