tv9 Marathi Special Report | अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?, लवकरच अटक होण्याची शक्यता

tv9 Marathi Special Report | अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?, लवकरच अटक होण्याची शक्यता

| Updated on: Apr 01, 2026 | 10:51 AM

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्याची पत्नी कल्पना खरात सध्या घरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्याची पत्नी कल्पना खरात सध्या घरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी कल्पना खरातलाही अटक करण्याची तयारी सुरू केली असून तिचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात केवळ खरात कुटुंबच नव्हे, तर काही डॉक्टर, सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर्स देखील एसआयटीच्या रडारवर असल्याचे समजते. शिर्डी येथील जमीन खरेदी व्यवहारात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांविरुद्ध फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, कल्पना खरात आणि अशोक तांबे यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कल्पना खरातला बेड्या ठोकल्या जाऊ शकतात.

Published on: Apr 01, 2026 10:51 AM
Follow Us