सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!

सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!

| Updated on: Jun 30, 2026 | 6:54 PM

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पक्षप्रवेशानंतरही “मी पक्ष सोडलेला नाही,” असे विधान सचिन अहिर यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने सचिन अहिर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, कायद्याच्या दृष्टीने त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

वकिल असीम सरोदे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, विधानपरिषदेचे उपसभापतीपद मिळाल्यानंतर सचिन अहिर यांना अपात्रतेच्या कारवाईपासून संरक्षण मिळू शकते. कायद्यात सभापती, उपसभापती तसेच विधानसभा अध्यक्ष पदासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यांच्या आमदारकीबाबतही असीम सरोदे यांनी मत मांडलं. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा त्यांच्यावर लागू होणार नसल्याचे बोलले जात आहे.

Published on: Jun 30, 2026 6:48 PM
Follow Us