झालेली चूक पुन्हा करू नका, लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी

झालेली चूक पुन्हा करू नका, लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी

Harshada Shinkar | Updated on: Jun 14, 2024 | 5:39 PM

लोकसभा निवडणुकीत झालेली चूक विधानसभा निवडणुकीला करू नका, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितेल आहे. तर विकासनिधी देऊनही तालुक्यातून मताधिक्य कमी कसं? असा सवाल विधानसभा निवडणुकीसंदर्भात आदेश देताना अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील १३ विधानसभा मतदारसंघात तयारी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक विधानसभा निवडणुकीला करू नका, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितेल आहे. तर विकासनिधी देऊनही तालुक्यातून मताधिक्य कमी कसं? असा सवाल विधानसभा निवडणुकीसंदर्भात आदेश देताना अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी हा संतप्त सवाल कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला आहे. तर आतापासूनच तयारीला लागा, १३ विधानसभेत तयारी करा, अशी तंबीच अजित पवार यांनी पराभवानंतर कार्यकर्त्यांनी दिली आहे.

Published on: Jun 14, 2024 5:39 PM
Follow Us