Parbhani News | परभणीत ATS चा धडाका! 10 ठिकाणी छापेमारी, अनेक जण ताब्यात!
परभणी शहरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत विविध भागांत एकाच वेळी धाडी टाकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धार रोड परिसर, मुमताज कॉलनीसह शहरातील सुमारे 10 ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली.

या कारवाईदरम्यान काही संशयित व्यक्तींना ATS ने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या कारवाईचे नेमके कारण किंवा तपासाचा विषय याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, धार रोड परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण परिसरावर सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ATS आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कारवाईनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, ATS च्या पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.