राज साहेबांनी गोविंदा पथकांना… मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
ठाण्यातील भगवती मैदानावर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अनेक गोविंदा पथके या ठिकाणी दाखल झाली असून शिवतेज महिला पथकाने सात थर लावून सलामी दिली आहे. अविनाश जाधव यांनी गोविंदांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गोविंदा तीन महिने सराव करतात, दिवसभर नोकरी करून रात्री बारा वाजेपर्यंत सराव करतात
ठाण्यातील भगवती मैदानावर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अनेक गोविंदा पथके या ठिकाणी दाखल झाली असून शिवतेज महिला पथकाने सात थर लावून सलामी दिली आहे. अविनाश जाधव यांनी गोविंदांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गोविंदा तीन महिने सराव करतात, दिवसभर नोकरी करून रात्री बारा वाजेपर्यंत सराव करतात. राज साहेबांनी २०१६ मध्ये गोविंदा पथकांना पाठिंबा दिल्याने हा सण टिकून राहिला, असे जाधव यांनी नमूद केले. या दहीहंडीला आम्ही सण आणि स्वप्न टिकवणारी दहीहंडी असे म्हटले आहे.
गोविंदा नऊ, दहा आणि आता अकरा थर लावण्याचे स्वप्न पाहत आहेत आणि ते पूर्णही करत आहेत. यावेळी, अविनाश जाधव यांनी काही सामाजिक मुद्द्यांवरही आपले मत व्यक्त केले. पुण्यातील गणेशोत्सवातील डीजेच्या आवाजाच्या वादावर बोलताना ते म्हणाले की, सण साजरे झालेच पाहिजेत, पण इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणावर बोलताना, सरकारने मराठा समाजाला फसवनू नये, अन्यथा जरांगे यांची आंदोलने थांबणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
