tv9 Special Report | सुनेत्रा पवार यांचा बॅनरवरून फोटो गायब; तटकरेंच्या रायगडमधील प्रकाराने खळबळ

tv9 Special Report | सुनेत्रा पवार यांचा बॅनरवरून फोटो गायब; तटकरेंच्या रायगडमधील प्रकाराने खळबळ

| Updated on: Feb 06, 2026 | 11:15 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर विरोधकांकडून अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याचे आरोप सुरू असतानाच आता एका बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर विरोधकांकडून अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याचे आरोप सुरू असतानाच आता एका बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या सभेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र सभास्थळी लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार यांचा फोटो नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती येतील, असे दावे काही नेत्यांकडून केले जात असतानाच बॅनरवर त्यांचाच फोटो गायब असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, मात्र स्थानिक नेत्यांनी अजित पवारांच्या निधनाआधीच म्हणजे ४ फेब्रुवारीच्या सभेचं बॅनर आम्ही २८ जानेवारी पूर्वी छापल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यावेळी सुनेत्रा पवारांचा फोटो बॅनरवर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या निधनानंतर आधीच विरोधकांकडून टीकेचा भडिमार सुरू असताना, या बॅनर प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एका वादाची भर पडली असून राजकीय वर्तुळात यावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Published on: Feb 06, 2026 11:15 AM