Shivsena Ubt | ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही? सुनेत्रा पवार यांच्या फोननंतर मोठ्या घडामोडींना वेग

Shivsena Ubt | ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही? सुनेत्रा पवार यांच्या फोननंतर मोठ्या घडामोडींना वेग

| Updated on: Apr 04, 2026 | 1:35 PM

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक नेते आणि संपर्क नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार लढवू नये, असा सल्ला चर्चेत आहे. सद्याच्या परिस्थितीत, या विषयावर ठाकरे गटाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून ही भूमिका आज किंवा उद्या जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

राज्यातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू झाले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये काल रात्री सविस्तर चर्चा झाली. मात्र यावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे, या चर्चेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक नेते आणि संपर्क नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार लढवू नये, असा सल्ला चर्चेत आहे. सद्याच्या परिस्थितीत, या विषयावर ठाकरे गटाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून ही भूमिका आज किंवा उद्या जाहीर होण्याची अपेक्षा आहे. यामुळे बारामतीतील राजकीय समीकरणे पुढील दिवसांत अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Published on: Apr 04, 2026 1:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us