tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?

tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?

| Updated on: Apr 10, 2026 | 10:00 AM

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा राजकीय घडामोडींचा खेळ पाहायला मिळाला. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज माघारी घेण्यापूर्वी पक्षांतर्गत आणि आघाडीतील नेत्यांमध्ये जोरदार हालचाली झाल्या. अर्ज मागे घेण्याच्या काही तासांआधीच फोनाफोनी आणि भेटीगाठींचे सत्र रंगले होते.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा राजकीय घडामोडींचा खेळ पाहायला मिळाला. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज माघारी घेण्यापूर्वी पक्षांतर्गत आणि आघाडीतील नेत्यांमध्ये जोरदार हालचाली झाल्या. अर्ज मागे घेण्याच्या काही तासांआधीच फोनाफोनी आणि भेटीगाठींचे सत्र रंगले होते. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी तीन वेळा फोनवर संपर्क साधला. याशिवाय धनंजय मुंडे यांनी दोन वेळा फोन केला, तर मंत्री छगन भुजबळ यांनीही अर्ज मागे घेण्याची विनंती केली. सुप्रिया सुळे यांनी देखील सपकाळ यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करून अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले. या सर्व घडामोडीनंतर अखेर काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
परंतू, ही निवडणूक बिनविरोध झालेली नाही. बारामती मतदारसंघात एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 30 जणांनी माघार घेतली असून आता 23 उमेदवार रिंगणात आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासमोर 22 अपक्ष उमेदवारांचे आव्हान उभे आहे. मात्र प्रमुख विरोधक नसल्याने ही लढत एकतर्फी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

Published on: Apr 10, 2026 10:00 AM
Follow Us