Baramati | संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास… ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन रिक्त विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये आणि नेत्यांच्या वक्तव्यामध्ये दुमत आढळून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि ठाकरे गाटातील महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन रिक्त विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये आणि नेत्यांच्या वक्तव्यामध्ये दुमत आढळून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि ठाकरे गाटातील महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. पोटनिवडणुकी संदर्भात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक पार पडली. यासंदर्भात संजय राऊतांनी, ‘अजून काही ठरलेलं नाही’ असं सागितलं तर तटकरेंनी थेट ‘ठाकरे उमेदवार देणार नसल्याचं सागितलंय. या दोन्हीही वक्तव्यांमुळे सध्या संभ्रम निर्माण झाला आहे, तर आता उद्धव ठाकरे आणि सुनेत्रा पवारांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? हे पडद्याआडच आहे.
आता याच रहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील हालचलींना वेग आला आहे. या संदर्भात आज दुपारी 1 वाजता शिवसेना ठाकरे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राहुरीच्या जागेसाठी शिवसेनेतूनही काही जण इच्छुक असले तरी, मविआ म्हणून एकत्रित निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.
