Baramati ZP Election Result 2026 Update | बारामतीत सुपे गणात भाजपचा विजय

Baramati ZP Election Result 2026 Update | बारामतीत सुपे गणात भाजपचा विजय

| Updated on: Feb 09, 2026 | 12:27 PM

बारामतीमध्ये सुपे गणाचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत भाजपने मोठा विजय मिळवला असून, सुपे गणातून भाजपच्या उमेदवार उज्ज्वला खैरे विजयी झाल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सुपे गणात भाजपसाठी जागा रिकामी ठेवली होती, ज्यामुळे भाजपच्या उमेदवाराला विजय मिळवण्यास मोठा फायदा झाला.

त्याचबरोबर सांगलीमध्ये झालेल्या निवडणुकीत 61 जागांपैकी 8 जागांवर भाजपने आघाडी मिळवली आहे. शिंदेंच्या शिवसेनेने 5 जागांवर आपली पकड कायम राखली आहे. मात्र सांगलीत दादांच्या राष्ट्रवादी फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना 2 जागांवर यश मिळाले आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. या निकालांवरून स्पष्ट होते की बारामतीत भाजपची ताकद वाढत आहे, तर सांगलीमध्ये विविध पक्षांमध्ये स्पर्धा अजूनही सुरूच आहे.

Published on: Feb 09, 2026 12:27 PM