Beed Political Divide : चार गोष्टी चांगल्या अन् नीट राजकारण करा, तुम्ही भाजपसोबत सत्तेत, दादांचा राष्ट्रवादीला कोणाचा थेट इशारा?

Beed Political Divide : चार गोष्टी चांगल्या अन् नीट राजकारण करा, तुम्ही भाजपसोबत सत्तेत, दादांचा राष्ट्रवादीला कोणाचा थेट इशारा?

| Updated on: Oct 15, 2025 | 11:09 AM

बीडमध्ये हिंदू आक्रोश मोर्चातून आमदार संग्राम जगताप यांनी माघार घेतली. यामुळे हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांच्या पक्षावर टीका केली, त्यांनी हिंदूंच्या मतांवर निवडून येऊनही हिंदू हिताची भूमिका न घेतल्याचे म्हटले. दुसरीकडे, शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत असताना, भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी एकबोटेंच्या उपस्थितीवरूनही वाद निर्माण झाला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक अशा दोन स्तरांवर तीव्र आंदोलनं सुरू आहेत. एकीकडे, कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामधून दादा गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी माघार घेतल्याने नवा वाद सुरू झाला आहे. हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांच्या पक्षावर यावरून जोरदार टीका केली आहे. हिंदूंच्या मतांवर निवडून येऊनही पक्षाने हिंदू हिताच्या भूमिकेसाठी पाठींबा देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचा आरोप एकबोटे यांनी केला.

दरम्यान, भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्या मोर्चातील उपस्थितीवरून आंबेडकर अनुयायांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ज्या व्यक्तींवर गुन्हेगारी आरोप आहेत, त्यांचे फोटो बॅनर्सवर न लावण्याच्या सरकारी आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच, सरपंचाच्या हत्येवेळी हिंदुत्वाचा मुद्दा का उपस्थित केला नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. या दुहेरी आंदोलनांमुळे बीडमधील परिस्थिती तापली आहे.

Published on: Oct 15, 2025 11:09 AM