श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक

श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक

| Updated on: Aug 17, 2026 | 9:27 AM

ज्योतिर्लिंगांपैकी आज पाचवे ज्योतिर्लिंग आहे. त्या ठिकाणी पहिल्यांदाच म्हणजे संध्याकाळी 12:00 वाजेपासून भाविकांसाठी या ठिकाणी दर्शनाच्या रांगा देखील लावण्यात आलेल्या आहेत. आपण बघू शकता की सकाळच्या 6:30 वाजता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज पंचमी असल्यामुळं महिलांचा या ठिकाणी गर्दा देखील दिसून येत आहे. मंदिराच्यावर पाहिलं तर संपूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहिलं […]

ज्योतिर्लिंगांपैकी आज पाचवे ज्योतिर्लिंग आहे. त्या ठिकाणी पहिल्यांदाच म्हणजे संध्याकाळी 12:00 वाजेपासून भाविकांसाठी या ठिकाणी दर्शनाच्या रांगा देखील लावण्यात आलेल्या आहेत. आपण बघू शकता की सकाळच्या 6:30 वाजता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज पंचमी असल्यामुळं महिलांचा या ठिकाणी गर्दा देखील दिसून येत आहे. मंदिराच्यावर पाहिलं तर संपूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहिलं तर मंदिराच्या गाभार्यामध्ये फुलांची देखील आरास करण्यात आलेली आहे. त्यामुळं पाहिलं तर मंदिराचा संपूर्ण परिसर हा उजळून निघालेला आहे. आपण पाहू शकता की माझ्यासोबत काही महिला आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई काय सांगाल, तुम्ही किती वाजता मंदिराला दर्शनाला आलात आणि किती वाजता दर्शन झालं तुमचं? आमचं 4:00 वाजता आलोत, 6:00 वाजता दर्शन झालं. कसं झालं दर्शन? सगळी व्यवस्था? व्यवस्थित झालं. व्यवस्थित झालं. आज पंचमी देखील आहे. पंचमी आणि श्रावण सोमवार. हो. सोमवार पण आहे पहिलाच श्रावण महिन्यातला आणि आज नागपंचमी पण आहे. त्यामुळे आम्ही मुद्दामून आलोत. ताई काय सांगाल तुम्ही, एक लोटा पाणी आणलेलं आहे आणि संपूर्ण देवाला घातलेलं आहे. काय याचं महत्त्व नेमकं?

प्रदीप मिश्रा म्हणतात म्हणून एक लोटा जल, सभी समस्या का हल. असं समजून आम्ही वैद्यनाथाला प्रार्थना केली. पाऊस पडू दे बाबा, पाऊस नाही. यामुळं आम्ही पाणी घातलं. कुठून आलात तुम्ही? किती महिला आहेत तुमच्यासोबत आलेल्या? 11. लिंबगाव इथून आलो. काय साकडे घातले हो देवाला तुम्ही? देवाला पावसासाठीच. ताई काय सांगाल, किती वाजता तुम्ही मंदिराला आलात आणि कसं दर्शन झालं तुमचं? 4:00 वाजता आलो होतो. छान दर्शनं झाली. समाधान वाटतं दर्शनानं होऊन. आज पंचमी देखील असणार आहे? हो, आहे पंचमी आहे. पहिला श्रावण सोमवार, उपवास, पंचमी. त्यामुळे आलोत देवाला. मंदिराच्या आवारात सगळी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. फुलांची देखील आरास करण्यात आलेली आहे. मन प्रसन्न होणारं झालं? हो, प्रसन्न झालं. दर्शन करून मन प्रसन्न झालं. समाधान झालं. उठल्याला काही शीण आला नाही सकाळी लवकर. आपल्याकडे पाहिलं तर मराठवाड्यामध्ये खूप पाऊस कमी आहे. हो. पाऊस कमी आहे. प्रार्थना केली आम्ही वैद्यनाथाच्या चरणी पावसासाठी. पाऊस पडू दे म्हणून. पाऊस पडला पाहिजे, बळीराजा सुखी झाला पाहिजे. सुखी झाला पाहिजे. शेतकऱ्याला समाधान केलं पाहिजे. पुन्हा रोगराई नाही आली पाहिजे. सगळे सगळ्यांना निरोगी ठेवावं, अशी शंकराला प्रार्थना केली. आपण पाहू शकता या महिलांनी एक संपूर्ण या ठिकाणी पाऊस पडला पाहिजे म्हणून देवाला पाणी देखील घालण्यात आलेलं आहे.

Published on: Aug 17, 2026 9:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us