Bhiwandi Mayor Election | भिवंडीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत राजकीय ट्विस्ट; भाजपमधून फुटलेल्या गटाला काँग्रेसचा पाठिंबा

Bhiwandi Mayor Election | भिवंडीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत राजकीय ट्विस्ट; भाजपमधून फुटलेल्या गटाला काँग्रेसचा पाठिंबा

| Updated on: Feb 20, 2026 | 10:53 AM

भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीची निवडणूक आज पार पडणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणांमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून भिवंडी शहराच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडत आहे. भाजपमधून फुटलेल्या गटाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीची निवडणूक आज पार पडणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणांमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून भिवंडी शहराच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडत आहे. भाजपमधून फुटलेल्या गटाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार नारायण चौधरी यांनी काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आपल्या नगरसेवकांसाठी पक्षादेश (व्हीप) सुद्धा जारी करण्यात आला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे विविध पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. तसेच फोडाफोडीच्या चर्चांमुळे आणि बदलत्या राजकीय गणितांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. आता या सर्व घडामोडींमध्ये महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण भिवंडीकरांचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 20, 2026 10:53 AM