Ashok Kharat Bank Account | भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका… अखेर…

| Updated on: Mar 26, 2026 | 1:37 PM

राज्यभरात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता, भोंदूबाबा खरात यांच्या शिवनिका संस्थानचे बँक अकाउंट सील करण्यात आले असून, आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडून कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकाने याबाबत माहिती मागवण्यात आली आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तांचा शोध सुरू आहे.

याबरोबरच, भोंदूबाबा खरात यांच्या विरोधात आतापर्यंत दाखल केलेले सर्व 10 गुन्हे SIT च्या माध्यमातून तपासले जाणार आहेत. प्रकरणात खरातच्या राज्यातील मालमत्तेची सखोल चौकशी केली जाणार असून, त्यांच्या कोट्यवधींच्या आर्थिक संपत्तीची उघड होण्याची शक्यता आहे. तसेच, मालमत्ता खरेदीसाठी पैसे कुठून आले याचा तपासही करण्यात येणार आहे. या सर्व तपासामुळे आर्थिक घोटाळ्यांच्या बाबतीतही मोठ्या खुलास्याची अपेक्षा आहे.

Published on: Mar 26, 2026 01:37 PM
Follow Us