tv9 Marathi Special Report | खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर? वडेट्टीवारांचा दावा काय?

tv9 Marathi Special Report | खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर? वडेट्टीवारांचा दावा काय?

| Updated on: Mar 26, 2026 | 11:41 AM

भोंदू खरात प्रकरणात नवे धक्कादायक दावे समोर येत असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी दावा केला आहे की, खरातकडून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमध्ये तीन मंत्र्यांबाबत माहिती असून त्यामुळे त्यांचीही ‘विकेट’ जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर पुरावे नष्ट करण्यासाठी खरातचा एन्काउंटर होण्याची भीती वड्डेटीवार यांनी व्यक्त केली आहे.

भोंदू खरात प्रकरणात नवे धक्कादायक दावे समोर येत असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी दावा केला आहे की, खरातकडून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमध्ये तीन मंत्र्यांबाबत माहिती असून त्यामुळे त्यांचीही ‘विकेट’ जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर पुरावे नष्ट करण्यासाठी खरातचा एन्काउंटर होण्याची भीती वड्डेटीवार यांनी व्यक्त केली आहे. या वक्तव्यामुळे प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत गंभीर आरोप करत म्हटले की, खरातने 2007 साली बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा खून केला होता. या घटनेच्या बातम्या त्यावेळी वर्तमानपत्रांमध्येही प्रसिद्ध झाल्या होत्या आणि पोलिसांना याची माहिती असूनही दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, नाशिक पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, खरातने पाच जणांचा नरबळी दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दाव्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. सध्या खरातला दुसऱ्यांदा पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली असून 29 तारखेपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. मात्र, या सर्व घडामोडींमुळे प्रकरणातील तपास आणि सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Published on: Mar 26, 2026 11:41 AM
Follow Us