Ashish Shelar : ‘उनके दिमाग में सिर्फ…’, लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल

Ashish Shelar : ‘उनके दिमाग में सिर्फ…’, लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल

| Updated on: Apr 22, 2025 | 1:43 PM

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शेलारांची एक ऑडिओ सध्या चांगलीच व्हायरल होतेय. बघा शेलारांचा नेमका आरोप काय?

मुंबईतील सर्व लँड स्कॅमचे बादशाह हे उद्धव ठाकरे असल्याचे म्हणत भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी सडकून टीकास्त्र डागलं आहे. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात नेहमीच लँड स्कॅम असतं, असा हल्लाबोल देखील आशिष शेलार यांनी केलाय. भारतीय जनता पक्षाची नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. दरम्यान, आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये आशिष शेलार हे हिंदी भाषेत बोलताना ऐकायला मिळताय. मात्र आशिष शेलार यांच्या आवाजाच व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. बघा आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

Published on: Apr 22, 2025 01:43 PM