VIDEO | कीर्तिकर यांच्या ‘त्या’ दाव्यावर भाजप नेत्याची स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाला, ”त्यांनी मला स्वतः सांगितलं”

VIDEO | कीर्तिकर यांच्या ‘त्या’ दाव्यावर भाजप नेत्याची स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाला, ”त्यांनी मला स्वतः सांगितलं”

| Updated on: May 28, 2023 | 2:50 PM

शिंदे गटातील लोकांना भाजप सापत्न वागणूक देत असल्याचं कीर्तिकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजपसह शिंदे गटावर टीका होताना दिसत आहे. यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे

मुंबई : भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना (शिंदे गट) असणाऱ्या युतीत धुसफूस सुरू आहे. त्यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या आरोपावरून समोर येत आहे. शिंदे गटातील लोकांना भाजप सापत्न वागणूक देत असल्याचं कीर्तिकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजपसह शिंदे गटावर टीका होताना दिसत आहे. यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, जागा वाटपाच्या विषयावरून भाजप आणि शिंदे गटात कोणत्याही स्वरूपाचे वाद नाहीत. आमच्यात एकवाक्यता आहे. तर आपण स्वतः गजानन कीर्तीकरांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माझी कुठलीही नाराजी नाही किंवा असा कुठला विषय नसल्याचं स्वतः सांगितल्याचं ते म्हणाले. तर लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अजून कुठेही चर्चा नाही, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र फिरताय चांगलं काम करताय असेही ते म्हणाले.

Published on: May 28, 2023 02:50 PM
Follow Us