Amaravati | महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा, अमरावतीत कट्टर विरोधक एकत्र

Amaravati | महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा, अमरावतीत कट्टर विरोधक एकत्र

| Updated on: Feb 06, 2026 | 2:59 PM

अमरावतीच्या राजकारणात मोठा आणि महत्त्वाचा टर्न पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि MIM युतीबद्दल चर्चा सुरू होती, अमरावती महापालिकेच्या महापौरपदासाठी MIM ने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे महापौरपदासाठी भाजपला मोठा बळ मिळाले आहे आणि अमरावतीत महापौर खुर्चीवर भाजपचे उमेदवार विराजमान होण्याची शक्यता अधिक आहे.

अमरावतीच्या राजकारणात मोठा आणि महत्त्वाचा टर्न पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि MIM युतीबद्दल चर्चा सुरू होती, अमरावती महापालिकेच्या महापौरपदासाठी MIM ने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे महापौरपदासाठी भाजपला मोठा बळ मिळाले आहे आणि अमरावतीत महापौर खुर्चीवर भाजपचे उमेदवार विराजमान होण्याची शक्यता अधिक आहे. भाजपच्या श्रीचंद तेजवानी यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे, तर काँग्रेसकडून संजय शिरभाते यांनी अर्ज दाखल केला आहे. MIM चा भाजपला मिळालेला पाठिंबा हे निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे ठरत असून,या पाठिंब्यामुळे भाजपला केवळ मतांचा फायदा नाही तर राजकीय पातळीवरही सत्ता दृढ करण्याची संधी मिळत आहे. या युतीमुळे अमरावती महापालिकेतील राजकीय संतुलन बदलू शकते.

Published on: Feb 06, 2026 02:59 PM