याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना…
यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आता राजकीय वातावरण आणखी तापल्याचे दिसत आहे. उबाठा गटातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित खासदारांच्या मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. काल त्यांनी यवतमाळमध्ये सभा घेत भाजपवर निशाणा साधला होता. “40 वर्षांपूर्वी यवतमाळमध्ये भाजपचं कार्यालय तरी होतं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

उद्धव ठाकरे यांच्या या विधानाला आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एक जुना फोटो शेअर करत 1983 मधील अटलबिहारी वाजपेयी यांच्या यवतमाळ दौऱ्याची आठवण करून दिली. त्या काळात भाजप कार्यकर्त्यांनी पक्षासाठी निधी गोळा केला होता, असा दावा त्यांनी केला.
नवनाथ बन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “1983 मध्ये यवतमाळमध्ये भाजपचे कार्यक्रम होत होते. त्या काळात पक्षासाठी 1.51 लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यामुळे इतिहास माहिती नसताना वक्तव्य करू नये.”
या पोस्टनंतर ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामुळे यवतमाळमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.