BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा – सूत्र
डिलिमिटेशन बिलासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बिलाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात असतानाही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
डिलिमिटेशन बिलासंदर्भात सध्याच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी डिलिमिटेशन बिलावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विधेयकाला संसदेत पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिलिमिटेशन बिल मांडताना आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी भाजप देशभरात प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या बिलाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून डिलिमिटेशनची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत होती. आता या चर्चेला अधिकृत स्वरूप येण्याची शक्यता दिसत आहे. सध्या शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल आहेत, तरीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे.
