Navnath Ban | भाजपकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा

| Updated on: Mar 01, 2026 | 1:28 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य करत VSR कंपनीमध्ये त्यांचे विमान असून काही राजकीय नेत्यांची गुंतवणूक त्या कंपनीत असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यावर आता भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य करत VSR कंपनीमध्ये त्यांचे विमान असून काही राजकीय नेत्यांची गुंतवणूक त्या कंपनीत असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यावर आता भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. या प्रकरणात संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी आपण कालच केली होती. मात्र राऊत यांनी ना दिलगिरी व्यक्त केली ना माफी मागितली, असे बन यांनी सांगितले. त्यामुळे संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात येत असल्याची घोषणा नवनाथ बन यांनी केली. तसेच येत्या सात दिवसांत देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा राऊत यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Published on: Mar 01, 2026 01:28 PM
Follow Us