… तर जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, भाजपनं दिला इशारा

… तर जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, भाजपनं दिला इशारा

Harshada Shinkar | Updated on: Feb 05, 2023 | 10:55 AM

जितेंद्र आव्हाड यांच्या 'या' वक्तव्यावरून भाजपा युवा मोर्चा आक्रमक, दिला आंदोलनाचा इशारा

मुंबई : औरंगजेब आणि शायिस्तेखान होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते अशा प्रकारचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यावर भाजपा युवा मोर्चा आक्रमक झाला असून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि जितेंद्र आव्हाड सारखी औरंगजेब आणि शायिस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा सातत्याने अपमान करत आहेत आणि हा अपमान भाजपा हे खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपा सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी आव्हाडांना दिला आहे. जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक वारंवार ठरवून करीत आहेत. औरंगजेब आणि शायिस्तेखान यांच्याविषयी आव्हाडांच्या मनात आदराची भावना का आहे? कोणते नाते संबंध आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचा दाखवायचा चेहरा एक आणि करायचा चेहरा एक हे महाराष्ट्राला कळून चुकले आहे. आता ते शिव प्रेमींच्या भावनांचा अंत पाहत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा युवा मोर्चा राज्यभर औरंगजेब धार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करेल आणि आव्हाडांनी जर अशी वक्तव्य त्वरित थांबवली नाहीत तर औरंगजेबाच्या या पिलावळीला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

Published on: Feb 05, 2023 10:35 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us