Kolhapur Mayor | कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड

Kolhapur Mayor | कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड

| Updated on: Feb 06, 2026 | 2:53 PM

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकृतपणे रुपाराणी निकम यांच्या निवडीची घोषणा केली. या निवडणुकीत रुपाराणी निकम यांना 46 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या सचिन शेंडे यांना 35 मतांवर समाधान मानावं लागलं.

राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मोठा यश मिळाल्याचे दिसून आले. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या आठ प्रमुख महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीच्या प्रक्रियेला आज पूर्णविराम मिळाला. या निकालांमुळे महापालिकांमध्ये सत्ताधारी पक्षांचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून, अनेक शहरांमध्ये भाजप आणि महायुतीच्या गटाचा दबदबा स्पष्ट दिसून येत आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकृतपणे रुपाराणी निकम यांच्या निवडीची घोषणा केली. या निवडणुकीत रुपाराणी निकम यांना 46 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या सचिन शेंडे यांना 35 मतांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर कोल्हापूरच्या महापौर गादीवर भाजपचाच दबदबा पहायला मिळतोय.

Published on: Feb 06, 2026 02:53 PM