बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी

बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी

| Updated on: Sep 03, 2026 | 7:36 PM

बोरीवलीतील देवीपाडा मैदानावर तारामती चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे यंदाच्या दहीहंडी स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्याला संजय दत्त, अनिल कपूर, सिद्धार्थ जाधव यांसारख्या सेलिब्रिटींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. दोन देशांतील रॅप स्टार्सचे परफॉर्मन्स हे विशेष आकर्षण असेल.

मुंबईतील बोरीवली येथील देवीपाडा मैदानावर यंदाच्या दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तारामती चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने या भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे नियोजन शिवसेना नेते राज सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे समजते. या दहीहंडी महोत्सवामध्ये राजकीय नेत्यांसह अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. यंदाच्या वर्षी संजय दत्त, अनिल कपूर, धुरंधर फेम राकेश बेदी हे उपस्थित राहणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील सिद्धार्थ जाधव, नेहा खान आणि प्राजक्ता गायकवाड हे कलाकारही या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. केवळ सेलिब्रिटींची उपस्थितीच नव्हे, तर त्यांच्या विविध कलाकृतींचे सादरीकरणही होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच दोन देशांतील मोठे रॅप स्टार्स या ठिकाणी परफॉर्म करणार आहेत, जे यंदाच्या आयोजनाचे प्रमुख आकर्षण आहे.

या महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार आहे. टीव्ही नाईन मराठीसाठी संतोष कदम आणि गोविंद ठाकूर यांनी मुंबईतून हे वृत्त दिले.

Published on: Sep 03, 2026 7:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us