Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी

Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी

| Updated on: Jun 11, 2026 | 12:15 PM

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात पाणीपुरवठ्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या काही व्यक्तींनी थेट एका वस्तीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत 15 जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील साखी गावात ही घटना घडली. परिसरातील नळाला पाणी का सोडण्यात आले नाही, याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर वाद वाढत गेला आणि काही लोकांनी एकत्र येत संबंधित वस्तीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या हल्ल्यात महिला आणि पुरुषांसह एकूण 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर 19 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत प्रश्नावरून झालेल्या या हिंसक घटनेमुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 11, 2026 12:15 PM
Follow Us