Cabinet Expansion: उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मिळालेल्या या संधीच सोनं करू आणि महाराष्टाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे मत सामंत यांनी व्यक्त केले. दोनीही पक्षांमधे कुठल्याही प्रकारची नाराजी नसल्याचे सामंत म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत याची मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात वर्णी लागली आहे. त्यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद दिले. मिळालेल्या या संधीच सोनं करू आणि महाराष्टाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे मत सामंत यांनी व्यक्त केले. दोनीही पक्षांमधे कुठल्याही प्रकारची नाराजी नसल्याचे सामंत म्हणाले. हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आहे. अधिवेशनानंतर पुढचा विस्तार होईल त्यामुळे कुठल्याच प्रकाची नाराजी नसल्याचे सामंत म्हणले.
Published on: Aug 09, 2022 2:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
