190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका

190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका

| Updated on: Nov 02, 2026 | 11:00 AM

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी 190 कोटी रुपये खर्च करूनही प्रदूषित राहिली आहे. तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारूनही ९०% सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे काळ्या पाण्याची दुर्गंधी पसरली असून, लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

पंढरपुरातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे, जिथे 190 कोटी रुपये खर्च करूनही चंद्रभागा नदी आजही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. तीन टप्प्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारूनही नदीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. पंढरपूर शहरातील सुमारे ९०% सांडपाणी आणि 65 नाल्यांमधील पाणी थेट चंद्रभागा नदीत मिसळत असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नदीचे पाणी काळपट झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

विठूरायाच्या दर्शनापूर्वी ज्या चंद्रभागेमध्ये लाखो भाविक स्नान करतात, त्याच नदीच्या पाण्याची ही दुरावस्था वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. गोपाळपूर आणि पंढरपूर शहरातील सांडपाणी थेट चंद्रभागेच्या पात्रात मिसळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. श्रद्धेच्या या नदीला ग्रासलेला प्रदूषणाचा विळखा कधी सुटणार, याकडे आता वारकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Published on: Nov 02, 2026 10:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us