Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर…  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार

Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर… गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार

| Updated on: Jun 16, 2026 | 5:28 PM

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रतिभा धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रतिभा धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवड करण्यात यावी, अशी मागणी घेऊन धानोरकर गटाचे नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले.

दरम्यान, विभागीय आयुक्तांकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसताना राजेश अडूर हेही आपल्या समर्थकांसह विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. काल चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यालयात झालेली बैठक बेकायदेशीर असल्याचा दावा राजेश अडूर यांनी केला आहे.

त्या बैठकीत सहभागी झालेल्या नगरसेवकांनी गटनेता म्हणून जारी करण्यात आलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी राजेश अडूर यांनी केली आहे. या प्रकरणामुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 16, 2026 5:28 PM
Follow Us