पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर थेट मारामारीत

पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर थेट मारामारीत

| Updated on: May 06, 2026 | 1:50 PM

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नृत्य कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दोन तरुणांमधील किरकोळ वाद हाणामारीत परिवर्तित झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुस्ते गावात यात्रेच्या पार्श्वभूमीवर राधा पाटील हिचा भव्य नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नृत्य कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दोन तरुणांमधील किरकोळ वाद हाणामारीत परिवर्तित झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुस्ते गावात यात्रेच्या पार्श्वभूमीवर राधा पाटील हिचा भव्य नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरळीत सुरू असताना मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमाच्या अखेरीस दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. सुरुवातीला शब्दांत सुरू झालेला वाद काही वेळातच तीव्र झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. वाद वाढत गेल्याने संबंधित तरुणांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. काही जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तणावपूर्ण वातावरण पाहता आयोजकांनी कार्यक्रम तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी गर्दी बाजूला सारत परिस्थिती शांत केली असून पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

Published on: May 06, 2026 1:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us