महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
मुंबईतील चेंबूर परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

घटनेनंतर स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, हे झाड रस्त्याच्या बाजूलाच होते आणि जुन्या झाडाबाबत यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच जखमी विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी त्या झेन रुग्णालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.