Uddhav Thackeray Sabha BKC | Mumbai स्वतंत्र करणाऱ्यांना मुख्यमंत्री Uddhav Thackeray म्हणाले..

Uddhav Thackeray Sabha BKC | Mumbai स्वतंत्र करणाऱ्यांना मुख्यमंत्री Uddhav Thackeray म्हणाले..

| Updated on: May 14, 2022 | 10:50 PM

हे देवेंद्र फडणवीस बोलले काकरण ती मालकाची इच्छा बोलून गेले. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या जरी आल्या ना तरी हे जमणार नाही कारण जिवंत पणा हा येथील मर्द मावळ्यात आहे.

मुंबईः शिवसेनेच्या (Shivsena) आजची सभा अनेक कारणामुळे चर्चेत आली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) काही दिवसांपूर्वीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल असं सांगितले होते. त्याच शिवसेनेच्या जोषात आणि आवेशात उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेला सुरुवात केली. सभेला सुरुवात होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणत हिंदुत्वाचा आवेश भाजपकडून (Bharatiy Janata Party) आणला जात असल्याचे सांगत हे हिंदुत्वाचे रक्षक ते आहेत. मग समोर बसलेले कोण आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मुंबई मराठी माणसाने रक्त साांडवून मिळवली आहे. आंदण म्हणून मिळाली नाही. मुंबईवेगळं करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही आणि ते करून टाकू आम्ही असेही त्यांनी सांगितले.

Published on: May 14, 2022 10:50 PM