CM Meet LIVE | ओबीसींच्या विविध मागण्यांवर मुख्यमंत्र्यांची बैठक; वडेट्टीवार, भुजबळ, मलिक उपस्थित
सह्याद्री अतिथीगृह येथे ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, नवाब मलिक उपस्थित आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, नवाब मलिक उपस्थित आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवास्थान येथून विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. यासोबतच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि त्यांचं शिष्टमंडळ देखील बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. राज्य शासनाने तामिळनाडू आणि कर्नाटकच्या धरतीवर महाराष्ट्र राज्याची जातनिहाय जनगणना सुरू करावी, स्थानिक स्वराज्य संस्थामधील स्थगित झालेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे तोपर्यंत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, ओबीसींना 100 शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती, फ्रिशिप देण्यात यावी, ओबीसींच्या महाज्योती या संस्थेचे कामकाज भरीव अर्थसहाय्य पूर्ण क्षमतेने देण्यात यावे, अशा मागण्यांवर चर्चा होणार आहे.
