अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा स्थगित तर लोकसभा…

अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा स्थगित तर लोकसभा…

| Updated on: Jul 20, 2026 | 4:43 PM

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ने दिल्लीत जोरदार आंदोलन केले. संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकूणच संसदेतील पहिलाच दिवस अत्यंत वादळी ठरला.

आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका CJP कडून मांडण्यात आली. संसदेसमोर घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

मोर्चा संसदेकडे पुढे सरकत असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अडथळे उभे केले.

दरम्यान, संसदेचे कामकाजही गदारोळामुळे प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवला. महत्त्वाचं म्हणजे यामुळे लोकसभा 4 वेळा तर राज्यसभा 5 वेळा स्थगित करण्यात आली. या आंदोलनामुळे देशभरात या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 20, 2026 4:32 PM
Follow Us