Devendra Fadnavis : मन विषण्ण झालं… बळीराजाच्या मनगटात ताकद अन्… मुख्यमंत्र्यांनी दिला मोठा शब्द!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. लातूर आणि बीड जिल्ह्यांतील पाहणीदरम्यान त्यांनी वाहून गेलेली पिके आणि उद्ध्वस्त झालेले संसार पाहून दुःख व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील परिस्थितीबाबत ट्विट केले आहे. लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची वाहून गेलेली पिके आणि नुकसान पाहून मन विषण्ण झाल्याचे व्यक्त केले. फडणवीसांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे की, महाराष्ट्राच्या मातीत संकटावर मात करण्याची ताकद आहे आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीची भरपाई करण्यासाठी आधीच 2200 कोटी रुपयांची तातडीची मदत दिली आहे आणि पुढील गरजेनुसार अधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या कठीण काळात एकमेकांना धीर देऊन मदत पोहोचवणे महत्त्वाचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
Published on: Sep 25, 2025 5:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
