tv9 Marathi Special Report | आता काही खैर नाही… पलाश मुच्छलवर थेट गुन्हा… स्मृती मंधानाच्या जवळच्या…
स्मृती मंधाना सोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल परत एकदा नव्या वादात आला आहे. संगीतकार पलाश मुच्छल विरोधात सांगलीमध्ये तक्रार दिली गेली आहे. स्मृतीच्या बालमित्रानेच फसवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
स्मृती मंधाना सोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल परत एकदा नव्या वादात आला आहे. संगीतकार पलाश मुच्छल विरोधात सांगलीमध्ये तक्रार दिली गेली आहे. स्मृतीच्या बालमित्रानेच फसवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. स्मृती पलाशच्या लग्नामुळे वादात असलेल्या पलाशवर आता 40 लाखांच्या फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ‘नजरिया नावाच्या सिनेमामध्ये काम देतो त्या बदल्यात तू सिनेमा प्रोड्युस कर, त्यात 40 लाख गुंतव, तुला चांगला मोबदला मिळवून देतो’ असं आमिष पलाश मुच्छलने स्मृतीचा मित्र विज्ञान माने याला दिलं होतं. याच प्रकरणावरून माझी फसवणूक झाल्याचं सांगून विज्ञान माने ह्याने पोलीसात तक्रार केली आहे. माझे पैसे मला परत मिळावे अशी मागणी विज्ञान माने ह्याने केली आहे.
Published on: Jan 23, 2026 12:42 PM
