India-Pakistan Conflict : राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. त्यांच्या भेटीत काय चर्चा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे,
कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसंदर्भातली ही भेट आहे. ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात असून त्यांच्यात काय चर्चा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर या बैठकीत पाकिस्तानसोबत तयार झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी आपण एकत्र आहोत अशीच भूमिका या हल्ल्यानंतर राहुल गांधी यांची राहिली आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Published on: May 05, 2025 6:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
