Baramati News | ‘मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव…’ आकाश मोरे काय म्हणाले?
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी आकाश मोरे यांनी भावनिक वक्तव्य केलं.ते नेमंक काय म्हणाले?
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी आकाश मोरे यांनी भावनिक वक्तव्य केलं.ते नेमंक काय म्हणाले?
आकाश मोरे म्हणाले मी जड अंतः करणाने फॉर्म मागे घ्यायला जातोय, माझ्यावर कोणताही दबाव नाही, मी निष्ठावंत कर्यकर्ता आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना थेट उत्तर देत ते म्हणाले प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्यानुसारच आम्ही करत आहेत.
दरम्यान गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. उमेदवारी मागे घेताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपसोबत आहे, यावर त्यांनी टीका केली.
