Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना… ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर

Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना… ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर

| Updated on: Jul 22, 2026 | 5:00 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता कोर्टाने महत्त्वाचे पाऊल उचलत संबंधित 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वतंत्र गटाला दिलेल्या मान्यतेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर ही कारवाई झाली आहे.

या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “न्यायालयाने सर्व संबंधितांना उत्तर देण्याची संधी दिली असून पुढील सुनावणीत या प्रकरणाची दिशा स्पष्ट होईल.” सुत्रांच्या माहितीनुसार केवळ 6 खासदारांनाच नव्हे, तर या प्रकरणामुळे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होऊ शकतात अशा चर्चा आहेत.

यापूर्वी ठाकरे गटाने बंडखोरी करणाऱ्या खासदारांना पक्षाच्या वतीने नोटीस बजावून 7 दिवसांत स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर आता न्यायालयाकडूनही नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान, विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सचिन आहिर यांनी अर्ज भरल्यानेही राजकीय चर्चांना वेग आला आहे. आता संबंधित खासदार न्यायालयात काय उत्तर देतात आणि पुढील सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 22, 2026 4:50 PM
Follow Us