Weather Alert: मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या 3 राज्यांना तातडीने अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, ते उद्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, तामिळनाडूच्या तिरुपत्तूर जिल्ह्यात इंजिन नसलेल्या मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ नावाच्या आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ उद्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटरपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे संबंधित राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, तामिळनाडूतील तिरुपत्तूर जिल्ह्यामध्ये एक रेल्वे अपघात घडला आहे. या दुर्घटनेत मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, इंजिन नसलेले हे मालगाडीचे डबे यार्डमध्ये उभे होते, त्यावेळी ते रुळावरून घसरले. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
Published on: Nov 02, 2026 10:32 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
