मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला

मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला

| Updated on: Jul 23, 2026 | 4:10 PM

राज्यात तसेच देशभरात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात आता एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटात मंत्रीपदाबाबत मोठ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. आधीच ठाकरे गटातील फुटीर खासदार या शर्यतीत असल्याचं सांगितलं जात होतं, आता त्यात मंत्री दीपक केसरकर यांची भर पडली आहे.

राज्यात तसेच देशभरात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात आता एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटात मंत्रीपदाबाबत मोठ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. आधीच ठाकरे गटातील फुटीर खासदार या शर्यतीत असल्याचं सांगितलं जात होतं, आता त्यात मंत्री दीपक केसरकर यांची भर पडली आहे. अलीकडे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य तुफान चर्चेत आलं आहे.

केसरकरांना मंत्रीपदाबाबत विचारताच ते म्हणाले, “मला मंत्री करणं न करणं हे शिंदेंच्या हातात आहे. तो निर्णय त्यांच्या हातात आहे. ही गोष्ट वेगळी की फडणवीसांना माझ्याबाबत खूप आपुलकी आहे, मात्र ते भाजपचे आहेत मी शिवसेनेचा त्यामुळे मी मंत्रीपदासाठी पक्ष बदलू शकत नाही. बदलणारही नाही, त्यामुळे काय आहे, सगळंच त्यांच्याच हातात आहे.”

Published on: Jul 23, 2026 4:10 PM
Follow Us