चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरील चित्रपटात नेमकं काय असणार?
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या धक्कादायक कारनाम्यांनी सगळ्यांना हादरवलं होतं. आता त्याच्या या कुकर्मांवर आधारित एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या धक्कादायक कारनाम्यांनी सगळ्यांना हादरवलं होतं. आता त्याच्या या कुकर्मांवर आधारित एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या बहुचर्चित चित्रपटात त्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारताना दिसू शकतात, अशी जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.
या चित्रपटाबाबत बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरच मला भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्या प्रकरणाची माहिती मिळाली. या चित्रपटात आपण एका महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नागरिकांना सतर्क करताना त्या म्हणाल्या की, “अशा भोंदूबाबांपासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. समाजात असे अनेक खरात आजही कुठे ना कुठे लपून बसले असतील.” मात्र, चित्रपटातील आपल्या अचूक भूमिकेबाबत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. “माझी भूमिका नेमकी काय असेल, हे मी आताच सांगणार नाही, ते तुम्हाला लवकरच चित्रपटात पाहायला मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर त्यांनी स्वतःच यावरुन परदा उठवला.
