डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? ‘त्या’ एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी हे विधेयक मंजूर झालं नव्हतं. मात्र आता पावसाळी अधिवेशनात हेच विधेयक पुन्हा मांडण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, INDIA आघाडीतील काही प्रमुख पक्षांचा आधी विरोध होता. मात्र, काही अटी आणि शर्तींसह अनेक पक्ष या विधेयकांना पाठिंबा देण्यास तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्षांनीही सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेत देशातील जागांमध्ये 50 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी शरद पवार गट विधेयकाला पाठिंबा देईल, अशा चर्चा आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि डीएमके यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत इतर पक्षांनी कोणती अधिकृत माहिती दिलेली नाही.