शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा

शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा

| Updated on: Aug 25, 2026 | 9:38 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता एका क्लिकद्वारे वितरित केला. याअंतर्गत आज ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,०८६ कोटी जमा करण्यात आले. यापूर्वीच्या हप्त्यासह आतापर्यंत १२ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटी वितरित करण्यात आले आहेत. यावेळी फडणवीस म्हणाले की, सर्व पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता एका क्लिकद्वारे वितरित केला. याअंतर्गत आज ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,०८६ कोटी जमा करण्यात आले.

यापूर्वीच्या हप्त्यासह आतापर्यंत १२ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटी वितरित करण्यात आले आहेत.

यावेळी फडणवीस म्हणाले की, सर्व पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ₹५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देखील पुढील टप्प्यात त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Published on: Aug 25, 2026 9:38 AM
Follow Us