शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल… मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, मी शक्यतो कमी सत्कार स्वीकारतो. मात्र, किसान मोर्चाने सत्कारासाठी आग्रह धरल्यानंतर मी होकार दिला, कारण या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्याची संधी मिळते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्याची मोठी घोषणा केली. ते म्हणाले, “जे शेतकरी 2019 मधील योजनेत पात्र होते मात्रनंतर डिफोल्टमध्ये गेले त्यांनाही आता या कर्जमाफीचा लाभ मिळणार. तसेच, काही शेतकऱ्यांनी 10 ते 12 हजार रुपये भरले असले तरी त्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 48 हजार कोटींचे जुने विज बिल माफ करणार असल्याची मोठी घोषणा सीएम फडणवीसांनी घेतली आहे.
फडणवीस यांनी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी विभागातील सहकाऱ्यांचेही आभार मानले. महायुती सरकारने कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसतानाही विकासकामांना प्राधान्य दिले असून जनतेसाठी काम करण्याची बांधिलकी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.