महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?

महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?

| Updated on: May 12, 2026 | 12:42 PM

राज्यातील पोलीस दलासाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित घरकुल प्रस्तावांना गती देत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 5,459 पोलिसांच्या घरांसाठी 1,768.08 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे हे प्रस्ताव प्रलंबित होते. या निर्णयामुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती देताना मागील महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. “2014 ते 2019 या काळात आम्ही पोलिसांसाठी व्याजसवलत अनुदान योजना मोठ्या प्रमाणावर राबवली होती. मात्र महाविकास आघाडीच्या काळात ही योजना बंद करण्यात आली. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना प्राधान्याने सुरू केली,” असे फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान, ‘घरबांधणी अग्रीम’ (HBA) योजनेअंतर्गत 5,459 पोलीस कर्मचाऱ्यांनी घर खरेदी किंवा बांधकामासाठी अर्ज केले होते. महामंडळाकडून प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आता 1,768.08 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या घरबांधणीसाठी लागणाऱ्या आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, त्यांच्या कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

Published on: May 12, 2026 12:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us