Chandrashekhar Bawankule Meet Devendra Fadnavis | रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; चर्चा गुलदस्त्यात?
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नागपुरातील रामगिरी निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून नागपुरात मुक्कामी असून, आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रामगिरी निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नागपुरातील रामगिरी निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून नागपुरात मुक्कामी असून, आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रामगिरी निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. या भेटीदरम्यान राज्यातील महत्त्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी राजकीय घडामोडी, सरकारच्या विविध निर्णयांबाबत तसेच राज्यातील प्रलंबित विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, बैठकीनंतर कोणती नवी माहिती समोर येते, याची उत्सुकता वाढली आहे.
