Special Report | देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी सुरु केली. प्रत्यक्ष बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणं फडणवीसांनी सुरु केलं आहे. तर हाता-तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी सुरु केली. प्रत्यक्ष बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणं फडणवीसांनी सुरु केलं आहे. तर हाता-तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत. राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते आज पूरग्रस्त मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. वाशिम, हिंगोली आणि नांदेडमध्ये जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. या दोघांनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. आजचा दौरा हा प्रशासनाला जागं करण्यासाठी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published on: Oct 02, 2021 09:49 PM
