अरे, तुम्ही मला पाणीच… सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल

अरे, तुम्ही मला पाणीच… सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल

| Updated on: Aug 06, 2026 | 12:17 PM

काँग्रेसने 'गुंगी गुडिया' म्हणत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. सुनेत्रा पवार यांनी स्वतःकडे राज्याचे अर्थखाते...

काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ म्हणत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. सुनेत्रा पवार यांनी स्वतःकडे राज्याचे अर्थखाते घ्यावे आणि आपण ‘गुंगी गुडिया’ नसल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले होते. काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ उल्लेखानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकरणी धनंजय मुंडेंनाही अनेकांनी खडेबोल सुनावले.

बीडच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या प्रश्नांवर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना अडवले होते. यावेळी सुनेत्रा पवारही समोर होत्या, मात्र त्या या विषयावर काहीच म्हणाल्या नाहीत. त्यानंतर काँग्रेसने पवारांवर ‘गुंगी गुडिया’ अशी टीका केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांच्या पक्षातील नेत्यांनीही त्यांना खडेबोल सुनावले होते. दरम्यान, आता याच पत्रकार परिषदेपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या सर्व प्रकरणानंतर आता धनंजय मुंडेंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. धनंजय मुंडे हे पत्रकारांसोबत बोलताना दिसत आहेत. पत्रकारांनी पाणी देखील विचारले नाही, त्यामुळे ते परिषदेवर बहिष्कार टाकणार होते, असे या व्हिडीओमध्ये सांगितले जात आहे. त्यावर धनंजय मुंडे म्हणतात, ‘अरे, तुम्ही मला पाणी पाजूनच दिले नाही ना…’ त्याच्या या मिश्किल विधानाची सध्या चर्चा रंगली आहे.

Published on: Aug 06, 2026 12:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us